Sangli Today | मिरज : मिरज शहरात धारदार शस्त्रांची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीस मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताचा हा भाग असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गैरप्रकार टळला आहे.
पाटीलसिंग गुलाबसिंग दुधानी (वय 74, रा. सिख गल्ली, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून अंदाजे 710 रुपये किमतीचे पाच धारदार सुरे जप्त करण्यात आले आहेत.
महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच सांगली जिल्हा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून, गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासोबतच हद्दपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात शस्त्रविक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री सुमारे दोन वाजता शास्त्री चौक परिसरात सापळा रचला. संशयित तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे धारदार सुरे आढळून आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ही शस्त्रे कोणाला विक्रीसाठी आणली होती, याचा तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अशा प्रकारच्या कारवायांमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










