सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी; देशात प्रथम क्रमांक

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
डाक जीवन विम्याच्या १४२व्या वर्धापनदिनानिमित्त सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी. | फोटो : भारतीय टपाल विभाग (अधिकृत लोगो)

सांगली : डाक जीवन विम्याच्या १४२व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली टपाल विभागाने देशपातळीवर विक्रमी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका दिवसात तब्बल ५,२०२ नागरिकांचा एकूण १६६ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला असून, ७ कोटी ४१ लाख रुपयांहून अधिक हप्ता भरणा करण्यात आला आहे.

वर्धापनदिनानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘महा लॉगिन डे’ उपक्रमात सांगली टपाल विभागाने सर्वाधिक पॉलिसी नोंदवून आघाडी घेतली. शहरी भागासाठी डाक जीवन विमा (PLI) तर ग्रामीण भागासाठी ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनेंतर्गत ही नोंदणी करण्यात आली.

या यशासाठी सांगली विभागातील सर्व मुख्य व उपटपाल कार्यालये तसेच कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केल्याचे सांगण्यात आले. सांगलीच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र सर्कलनेही राज्यस्तरावर आघाडी घेतली असून, एकूण ८२० कोटी रुपयांहून अधिक विमा उतरवण्यात आला आहे.

डाक जीवन विमा सेवेवर जनतेचा असलेला विश्वास हीच या यशाची मुख्य ताकद असल्याचे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: आचारसंहितेत मिरज महामार्गावर १५ किलो चांदी जप्त; महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा