सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ? वापर तितकाच, मात्र वाढलेली बिले नागरिकांसाठी चिंतेचा विषय

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगलीत बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर; नागरिकांकडून वीज बिल वाढल्याच्या तक्रारी. | फोटो : प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : सांगली शहर व परिसरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर अनेक नागरिकांचे वीज बिल अचानक वाढून येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे वीज वापरात कोणताही बदल नसतानाही मागील महिन्यांच्या तुलनेत वाढीव बिले येत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.

काही नागरिकांच्या मते, स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी दरमहा ५०० ते ८०० रुपयांपर्यंत येणारे वीज बिल आता १,२०० रुपये ते थेट १,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. वीज वापर पूर्वीइतकाच असूनही बिलात लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत तसेच नवीन मिटरच्या बिल आकारणी प्रक्रियेबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे. अनेकांनी महावितरणकडे याबाबत तक्रारी नोंदविल्या असून, वाढीव बिलांचे कारण स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, यापूर्वीही स्मार्ट मीटर बसविणे व वीज दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. स्मार्ट मीटर केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळेच बसविले जात असून, जबरदस्तीने मीटर लावले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता.

स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्षात वीज बिलात वाढ होत आहे की मोजणी पद्धतीत बदल झाला आहे, याबाबत महावितरणने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा: सांगली टपाल विभागाची विक्रमी कामगिरी; देशात प्रथम क्रमांक.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा