१० वी १२ वी परीक्षा काळात केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी; सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
दहावी–बारावी परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश लागू. | फोटो : प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी सांगली जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांच्या परिसरात कडक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पडावी व कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी परीक्षा केंद्रांच्या इमारतीपासून १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी केले आहेत.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ या कालावधीत ५२ केंद्रांवर, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत १०५ केंद्रांवर होणार आहे.

या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या परिसरात परीक्षेस संबंधित अधिकारी, कर्मचारी व परीक्षार्थी विद्यार्थी वगळता चार किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, गटागटाने फिरणे अथवा थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन आणि ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रांमध्ये मोबाईल फोन व पेजर नेण्यासही सक्त मनाई करण्यात आली असून, आदेशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीत स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी वाढ? वापर तितकाच, मात्र वाढलेली बिले नागरिकांसाठी चिंतेचा विषय.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा