मार्चमध्ये सांगली जिल्ह्यात RTO ची 20+ लायसन्स शिबिरे; तुमच्या तालुक्यात कोणत्या तारखेला?

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
मार्च 2026 मध्ये सांगली जिल्ह्यात आयोजित RTO लायसन्स शिबिराचे प्रतीकात्मक छायाचित्र.

सांगली : ग्रामीण भागातील नागरिकांना लायसन्ससाठी सांगली RTO कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी मार्च 2026 महिन्यात तालुकानिहाय शिकाऊ (Learner) व पक्क्या वाहन अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांत मार्च महिन्यात एकूण 20 पेक्षा अधिक शिबिरे होणार आहेत.

सांगली जिल्ह्यातील लायसन्स शिबिरांच्या तालुकानिहाय तारखा

  • उरूण इस्लामपूर (ईश्वरपूर) – 2 व 16 मार्च
  • कोकरूड – 2 मार्च
  • विटा – 4, 18 व 28 मार्च
  • कडेगाव – 11 व 23 मार्च
  • पलूस – 13 व 27 मार्च
  • आष्टा – 10 व 30 मार्च
  • आटपाडी – 17 मार्च
  • जत – 5 व 20 मार्च
  • शिराळा – 12 व 25 मार्च
  • तासगाव – 9 व 24 मार्च
  • कवठेमहांकाळ – 6 मार्च

या शिबिरांमध्ये शिकाऊ परवाना अर्ज, ड्रायव्हिंग चाचणी प्रक्रिया आणि पक्क्या अनुज्ञप्तीशी संबंधित कामे केली जाणार आहेत.

कोणासाठी उपयोगी?

नवीन वाहनचालक, शिकाऊ लायसन्स घेतलेले आणि पक्क्या लायसन्सची प्रतीक्षा असलेले ग्रामीण भागातील अर्जदार.

नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील शिबिरात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगलीतील कडेपूर ग्रामपंचायतीत 1,355 सेवा ऑनलाइन; AI-ब्लॉकचेन मॉडेलमुळे राज्यात प्रथम क्रमांक.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा