सांगली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरुवात झाली. मराठीच्या पहिल्या पेपरदरम्यान कोणताही गैरप्रकार आढळला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील 39 हजार 628 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला असून 105 केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 40 भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती. काही केंद्रांवर डिजिटल माध्यमातून देखरेखीची व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पहिल्या दिवशी केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. विद्यार्थी परीक्षा सुरू होण्यापूर्वी उजळणी करताना दिसले, तर पालकांमध्येही उत्सुकता व तणावाचे वातावरण दिसून येत होते. पेपर शांततेत वाचता यावा यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 10 मिनिटांचा वेळ देण्यात आला.
हेही वाचा: तुंग येथे ट्रकला दुचाकीची धडक; 29 वर्षीय युवकाचा मृत्यू, संतप्त जमावाने ट्रकची केबिन जाळली.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









