सांगली : मिरज तालुक्यातील तुंग येथे गुरुवारी रात्री रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसून 29 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड करत केबिनला आग लावल्याची घटना घडली.
शिवकुमार श्रीकांत पाटील (रा. ढवळी, ता. वाळवा) असे मृत युवकाचे नाव असून त्याचा मित्र यशवंत वसंत पाटील (रा. फार्णेवाडी, ता. वाळवा) जखमी झाला आहे. दोघे गुरुवारी रात्री दुचाकीवरून जात असताना तुंग येथील एका नर्सरीजवळ हा अपघात घडला.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक रस्त्याकडेला उभा करण्यात आला होता. मात्र ट्रकवर रिफ्लेक्टर किंवा पार्किंग लाईट सुरु नसल्याने अंधारात तो दिसला नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुचाकी ट्रकवर आदळल्यानंतर शिवकुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताची बातमी समजताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. त्यानंतर संतप्त जमावाकडून ट्रकची तोडफोड करण्यात आली आणि केबिनला आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.
सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










