सांगली जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी नसबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली : जिल्ह्यातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कुत्र्यांची नसबंदी करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्राणी जन्म नियंत्रण विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अजयनाथ थोरे, नगरपरिषद प्रशासन शाखेचे सहआयुक्त दत्तात्रय लांघी यांच्यासह जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून काम करावे, असे सांगण्यात आले. भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या अपघात व रेबिजसारख्या आजारांचा धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले की, शासकीय तसेच खासगी रुग्णालयांनी रेबिज प्रतिबंधक लस व इम्युनोग्लोबुलिनचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. तसेच शाळांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे होणारे आजार व त्यावरील प्रतिबंधक उपायांबाबत जनजागृती मोहीम राबवावी.

दरम्यान, पाळीव कुत्रे असलेल्या नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना फिरवताना स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा