सांगली शहरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी; नियमभंग केल्यास ऑनलाइन चलनाद्वारे दंडाची कारवाई

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : वाहतूक नियम व चिन्हे (सौजन्य : सांगली पोलीस – अधिकृत संकेतस्थळ)

सांगली : सांगली शहरातील विविध चौक व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर ऑनलाइन चलनाद्वारे दंड आकारला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, मोबाईलवर बोलणे तसेच नो एन्ट्रीमध्ये वाहन नेणे अशा नियमभंगाच्या घटनांची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे घेतली जात आहे. या प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम वाहनचालकांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे कळवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मारुती रोड, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग चौक, सांगली स्टँड, पटेल चौक तसेच अंकली टोल नाका परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: कडेगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा; शेतकऱ्यांना ₹3500 रुपये उचल.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा