सांगली : सांगली महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगली आणि कुपवाड शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत. पक्ष कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत असून, यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उपस्थित असल्याचे चित्र आहे.
पक्ष कार्यालयातुन मिळालेल्या माहितीनुसार, आज एकूण 153 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांची पार्श्वभूमी, अनुभव आणि पक्ष संघटनात्मक बाबींचा विचार करूनच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. मुलाखतीनंतर पक्षाकडून अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










