सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मागणीच्या अनुषंगाने वसंतदादा मार्केट यार्ड परिसरातील पक्ष कार्यालयात मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. या मुलाखतीसाठी जाताना एक इच्छुक उमेदवार व त्यांच्या काही समर्थकांनी राजर्षी शाहू महाराज शंभर फुटी रस्त्यावर विनापरवाना घोषणाबाजी करत मोटारसायकल रॅली काढल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जमावबंदी आदेश लागू केला असून सभा, मिरवणूक किंवा रॅलीसाठी निवडणूक आयोग व पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत पाकिजा मशीद ते जिल्हा शासकीय रुग्णालय रस्त्यावर रॅली काढण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी वसीम नायकवडी, बिरेंद्र थोरात, अॅड. आनंद परांजपे, महमंदअली मुल्ला, वैभव लाटवडे, अबरार मोमीन, सोहेल भंडारी, अंजर फकीर, मुस्तफा नदाफ, आसिफ जमादार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: पहिल्याच दिवशी तब्बल 574 उमेदवारी अर्जांची विक्री; ‘या’ प्रभागांमधून सर्वाधिक प्रतिसाद.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










