सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग येताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये माजी नगरसेविका विमलताई हिप्परकर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष विशाल हिप्परकर यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षाचे महापालिका निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत हिप्परकर यांच्या निवासस्थानी पार पडल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी दोघांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
पक्षप्रवेशानंतर बोलताना विमलताई व विशाल हिप्परकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत कार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
या वेळी प्रभाग क्रमांक १२ मधून भाजपकडून निवडणूक लढवत असलेले उमेदवार धीरज सूर्यवंशी, तसेच पैलवान दिलीपराव सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, पांडुरंग हिप्परकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील ही राजकीय घडामोड स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनली आहे.
हेही वाचा: सोशल मीडिया, पेड न्यूज व राजकीय जाहिरातींसाठी नवे नियम लागू; महापालिका स्तरावर MCMC समिती गठीत.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









