सांगली : शहरातील काही भागांत अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत विविध प्रभागांमध्ये वेळेवर आणि योग्य दाबाने पाणी पोहोचत आहे का, याची तपासणी करण्यात आली. पाणी गळती शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी येणाऱ्या भागांमध्ये तांत्रिक सुधारणा त्वरित करण्याचे निर्देश देण्यात आले.
पाईप इन्स्पेक्टर व व्हॉलमन यांच्यावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाणी वितरणाची स्पष्ट जबाबदारी निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींची निश्चित कालमर्यादेत सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून पाणीपुरवठा नियोजन अधिक सक्षम व व्यापक करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा; तुमच्या खात्यात जमा झाले का पैसे?.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









