सांगली : सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वातावरणातील बदल आणि वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान अस्थिर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींसह मेघगर्जना होऊ शकते.
18 ते 20 मार्चदरम्यान काही ठिकाणी हवामानात बदल होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांमध्ये गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
तसेच हवामानाचा अद्ययावत अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: सांगलीत गॅसचा तुटवडा? प्रशासनाने दिले मोठे स्पष्टीकरण.
- अपघातात मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत; ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’
- सांगलीत गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी मोठी कारवाई; ३७ एजन्सींची तपासणी, ३ जणांना अटक
- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत समित्यांचे सभापती बिनविरोध; अतुल माने स्थायी समितीचे सभापती
- कडेगाव वांगी हिट अँड रन प्रकरण; जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना मिळणार 1.01 लाख रुपये; संपूर्ण माहिती जाणून घ्या
- 7/12 दुरुस्ती, दाखले, PM-Kisan व इतर सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी; बुधगाव येथे 14 मार्चला विशेष शिबिर









