सांगली : इयत्ता १२वी ची परीक्षा १० फेब्रुवारी पासून तर १०वी ची परीक्षा २० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत परीक्षा केंद्रांवर अचानक तपासणी करण्यासाठी विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख ठेवली जाणार असून, आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ आणि तांत्रिक यंत्रणांचा वापर केला जाणार आहे.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांनी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नये, यासाठी समुपदेशनावरही भर देण्यात येत आहे. प्रामाणिक अभ्यास आणि कष्टाच्या जोरावरच खरे यश मिळते, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
यासोबतच सर्व पालकांनीही आपल्या पाल्यांनी अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा काळात कडक शिस्त राखली जाईल आणि कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारास थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान आवश्यक असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे सीईओ विशाल नरवाडे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: मिरज तालुक्यात 67 टक्के मतदान; किरकोळ वाद व ईव्हीएम बिघाडाचे प्रकार, मतमोजणी सोमवारी.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









