9 फेब्रुवारीला 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी; सांगली जिल्हा प्रशासन सज्ज

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
प्रतीकात्मक फोटो – Sangli Today

सांगली : शनिवारी पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सरासरी 69.76 टक्के मतदान झाले असल्याची माहिती अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. या निवडणुकीतीसाठीची मतमोजणी सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार असून, त्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे.

जिल्हा परिषदेसाठी 61 निवडणूक विभाग व दहा पंचायत समित्यांच्या 122 निर्वाचन गणांसाठी हे मतदान पार पडले. संपूर्ण जिल्ह्यातील मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय मतमोजणीसाठी टेबल व फेऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. आटपाडी येथे 18 टेबलवर 12 फेऱ्या, जत येथे 27 टेबलवर 13 फेऱ्या, खानापूर (विटा) येथे 16 टेबलवर 9 फेऱ्या, कडेगाव येथे 16 टेबलवर 11 फेऱ्या, तासगाव येथे 20 टेबलवर 12 फेऱ्या, कवठेमहांकाळ येथे 16 टेबलवर 9 फेऱ्या, पलूस येथे 14 टेबलवर 9 फेऱ्या, वाळवा येथे 22 टेबलवर 19 फेऱ्या, शिराळा येथे 20 टेबलवर 9 फेऱ्या तर मिरज येथे 22 टेबलवर 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणेही निश्चित करण्यात आली असून, आटपाडी येथे तहसील कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीतील पहिल्या मजल्यावरील हॉल, जत येथे जुने शासकीय धान्य गोदाम, खानापूर (विटा) येथे बळवंत कॉलेजमधील इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर, कडेगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), तासगाव येथे शासकीय बहुउद्देशीय कक्ष, कवठेमहांकाळ येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोरील मोकळी जागा, पलूस येथे दिवाणी न्यायालयाजवळील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, वाळवा येथे ईश्वरपूर येथील शासकीय धान्य गोदाम, शिराळा येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर मिरज येथे वैरण बाजार येथील शासकीय नवीन धान्य गोदामात मतमोजणी पार पडणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: दहावी–बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सांगली जिल्हा परिषद सज्ज; भरारी पथके व तांत्रिक यंत्रणांचा वापर.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा