सांगली जिल्हा परिषद संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ लिंकवर परदेशी जुगारविषयक संकेतस्थळ; सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : जिल्हा परिषद सांगलीच्या संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ लिंकवर उघडलेले असंबंधित संकेतस्थळ (Sangli Today स्क्रीनशॉट)

सांगली : Zilla Parishad Sangli यांच्या zpsangli.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर महत्वाचे दुवे ‘Important Links’ या विभागात देण्यात आलेल्या ‘Sangli Police’ sanglipolice.org या लिंकवर क्लिक केल्यानंतर असंबंधित व जुगारविषयक (ऑनलाइन कॅसिनो/स्लॉट) मजकूर असलेले परदेशी संकेतस्थळ उघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे शासकीय संकेतस्थळांच्या सायबर सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

🔔 Update: या बातमीनंतर सांगली जिल्हा परिषद संकेतस्थळावरील ‘Sangli Police’ लिंक दुरुस्त करण्यात आली आहे. (सविस्तर follow-up खाली वाचा)

जिल्हा परिषद संकेतस्थळावर District Officer’s Office आणि Sangli Police अशा अधिकृत विभागांच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. मात्र Sangli Police या लिंकवर क्लिक केल्यानंतर पोलिस प्रशासनाशी कोणताही थेट संबंध नसलेले, परदेशी भाषेत ऑनलाइन जुगार व कॅसिनोशी संबंधित मजकूर असलेले संकेतस्थळ उघडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे, संबंधित संकेतस्थळावर कॅसिनो गेम्स, स्लॉट्स, बेटिंगविषयक माहिती तसेच प्रचारात्मक मजकूर उपलब्ध असून, ‘Police’ या नावाचा वापर करून विश्वासार्हतेचा भास निर्माण केला जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Zilla Parishad Sangli संकेतस्थळावरील ‘Important Links’ विभागातील ‘Sangli Police’ लिंक – जिच्यावर क्लिक केल्यानंतर असंबंधित संकेतस्थळ उघडत असल्याचे आढळले
Zilla Parishad Sangli संकेतस्थळावरील ‘Important Links’ विभागातील ‘Sangli Police’ लिंक – जिच्यावर क्लिक केल्यानंतर असंबंधित संकेतस्थळ उघडत असल्याचे आढळले (Sangli Today स्क्रीनशॉट)

तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार डोमेन हायजॅकिंग, चुकीची लिंकिंग किंवा तांत्रिक त्रुटी यांपैकी कोणत्याही कारणामुळे घडलेला असू शकतो. काही प्रकरणांमध्ये एखादे डोमेन पूर्वी शासकीय किंवा अधिकृत वापरात असताना नंतर वापरातून काढले गेल्यास, ते डोमेन कालबाह्य होऊन इतर व्यक्ती किंवा संस्थेकडून नोंदवले जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जुन्या शासकीय संकेतस्थळांवरील लिंक्स अद्ययावत न केल्यास, नागरिक थेट असंबंधित किंवा दिशाभूल करणाऱ्या संकेतस्थळांवर पोहोचू शकतात.

मात्र शासकीय संकेतस्थळावरून अशा प्रकारचे असंबंधित व संवेदनशील मजकूर उघडणे हे प्रशासनासाठी चिंताजनक असून, तत्काळ तांत्रिक तपासणी करून संबंधित लिंक हटवणे किंवा योग्य अधिकृत संकेतस्थळाकडे वळवणे आवश्यक आहे.

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने, शासकीय वेबसाइट्सवरील सर्व बाह्य लिंक्सची नियमित तपासणी, पडताळणी व अद्ययावत करणे अत्यावश्यक असल्याचेही या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. संबंधित विभागांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती तातडीची कारवाई करावी.

स्पष्टीकरण :

सदर जुगारविषयक संकेतस्थळाचा सांगली पोलीस प्रशासनाशी कोणताही अधिकृत संबंध असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आलेला नाही. ही बाब केवळ जिल्हा परिषद सांगली यांच्या संकेतस्थळावरील लिंकवर क्लिक केल्यानंतर उघडणाऱ्या असंबंधित मजकुरासंदर्भातील निरीक्षणांवर आधारित असून, यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून अधिकृत चौकशी व स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

Update (नवीन घडामोड)

या संदर्भात ‘Sangli Today’ वर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीची दखल घेत संबंधित ‘Sangli Police’ लिंक दुरुस्त केली आहे. आता ती लिंक अधिकृत सांगली पोलीस संकेतस्थळाकडे वळवण्यात आली आहे.

सविस्तर follow-up बातमी वाचा: Sangli Today च्या वृत्ताची दखल : ZP Sangli संकेतस्थळावरील चुकीची ‘Sangli Police’ लिंक 3 तासांत दुरुस्त.

हेही वाचा: अंध बांधवांना आता सहजपणे ‘वाचता’ येणार; जिल्हा परिषद प्रशासनाचा अभिनव उपक्रम.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा