सांगली : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत १२ वी नंतर पदवी व पदव्युत्तर (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक) अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, सांगली येथे १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जमा करणे बंधनकारक आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे तसेच जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. मान्यताप्राप्त शासकीय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये व तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतलेल्या आणि शासकीय वसतिगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भटक्या जमाती–क धनगर समाज वगळून) तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही आणि ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी या योजनेस पात्र आहेत. जिल्हा स्तरावर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ४३ हजार रुपये, तर तालुका स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ३८ हजार रुपये इतका आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा; जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे आवाहन.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









