Sangli Today : शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन; भाजप आमदार पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व...
Sharad Pawar CM Fadnavis BJP MLA Padalkar Remarks

Sangli News Today : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar ) यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. पवारांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis) यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.

पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातील सभेत एनसीपी (SP) नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल तसेच त्यांच्या वडिलांविषयी टीका केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पडळकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, शरद पवारांनी स्वतः हस्तक्षेप करत नाराजी व्यक्त केली.

“अशा प्रकारची वक्तव्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाहीत. महाराष्ट्र नेहमी प्रगतिशील विचारांचा पुरस्कर्ता राहिला आहे. त्यामुळे अशा प्रकारची विधान अजिबात केली जाऊ नयेत,” अस पवारांनी फडणवीसांना सांगितल असल्याच एनसीपी सूत्रांकडून कळाल.

जयंत पाटील हे गेल्या काही वर्षांत राज्याचे मंत्री तसेच एनसीपी (एसपी) चे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत आले आहेत. ते माजी काँग्रेस नेते आणि सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या विधानाला राजकीय वर्तुळात मोठा विरोध होत आहे.

शरद पवार सध्या कोल्हापूर दौर्‍यावर असून, तिथूनच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून हे प्रकरण हाताळण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा: पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; चर्चेला उधाण.

Share This Article
Sangli Today Desk ही सांगली टुडे न्यूजची संपादकीय टीम आहे. आमची टीम सांगली जिल्ह्यातील सत्यापित बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते — सामाजिक कार्यक्रम, शिक्षण, शेती, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था, नागरिक प्रश्न आणि तालुका स्तरावरील घडामोडींवर लक्ष केंद्रित करते. दररोजच्या स्थानिक घटनांचा आढावा घेऊन अचूक व विश्वासार्ह माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.