मिरजेत दोन दिवस शिवजयंतीची रंगत; पोवाडे, मर्दानी खेळ आणि ‘श्रीमंतयोगी’ महानाट्य, सर्वांना मोफत प्रवेश

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
बालगंधर्व नाट्यमंदिरात शिवजयंती कार्यक्रमांत मर्दानी खेळांचा थरार. | प्रतिनिधिक छायाचित्र – Sangli Today

मिरज : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी दोन दिवस विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जीवनगाथेचा आणि शौर्यपरंपरेचा आविष्कार अनुभवण्यासाठी नागरिकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत ‘गाथा छत्रपती शिवरायांची, जागर शाहिरीचा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. पारंपरिक पोवाडे, शिवस्फूर्ती गीत, मर्दानी खेळ आणि लोकगीते यांमधून शिवचरित्राचा जागर रंगणार आहे.

19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘श्रीमंतयोगी’ हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे.

19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून इतिहास रचला. त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मिरजेत होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमांना मोफत प्रवेश असल्याने नागरिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.

हेही वाचा: मित्रासाठी घर सोडलं! विट्यातील नववीतील दोन मित्रांचा टोकाचा निर्णय.

TAGGED:
Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा