सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचा 28 वा वर्धापन दिन सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी महानगरपालिका मुख्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेचा मुख्यालय परिसर सजविण्यात आला होता. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त (आरोग्य व स्वच्छता ) श्रीमती स्मृती पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांना शुभेच्छा देताना आयुक्त सत्यम गांधी यांनी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांच्या अपेक्षा टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. महानगरपालिकेच्या विकास प्रवासात सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने शहरातील पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचा आणि नागरिकांना तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प प्रशासनाने व्यक्त केला.
हेही वाचा: सांगलीत राष्ट्रवादी (शरद पवार) सर्वात मोठा पक्ष; भाजप दुसऱ्या क्रमांकावर.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









