सांगली : जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या अंतिम टप्प्यातील अधिकृत आकडेवारीनुसार सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ६१ गटांपैकी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे १८ उमेदवार विजयी झाले असून भाजप १६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी आघाडी-समन्वय आवश्यक ठरणार आहे.
इतर पक्षांच्या कामगिरीकडे पाहता काँग्रेसचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ६, शिवसेना (शिंदे गट) ७ आणि उद्धव ठाकरे गटाचा १ उमेदवार विजयी झाला आहे. जनसुराज्य आणि रयत क्रांती आघाडीने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला वाळवा, तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा आणि मिरज तालुक्यांतील यशामुळे जिल्हा परिषदेत पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले. भाजपला जत तालुक्यात सर्वाधिक आठ जागा, तर मिरजमध्ये सहा जागा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांमध्ये विविध पक्षांकडे सत्ता विभागली गेली आहे. जत व मिरज येथे भाजप, वाळवा व कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादी (शरद पवार), शिराळा व तासगाव येथे राष्ट्रवादी (अजित पवार), पलूस व कडेगाव येथे काँग्रेस, तर खानापूर व आटपाडी येथे शिवसेना (शिंदे गट) सत्तेत आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपडेट (संध्याकाळी): नव्या अधिकृत आकडेवारीनुसार राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या जागांमध्ये वाढ होऊन तो सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल:
- राष्ट्रवादी (शरद पवार) – १८
- भाजप – १६
- काँग्रेस – ११
- राष्ट्रवादी (अजित पवार) – ६
- शिवसेना (शिंदे) – ७
- उद्धवसेना – १
- जनसुराज्य – १
- रयत क्रांती – १
टीप : ही बातमी अधिकृत निवडणूक आकडेवारी जाहीर होताच अद्ययावत करण्यात आली आहे.
हेही वाचा: खानापूर तालुक्यात शिवसेनेचा दणदणीत विजय; जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार विजयी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










