विटा : खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी निर्णायक आघाडी कायम ठेवत विजय मिळवला आहे. उपलब्ध अधिकृत व प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट तसेच आठ पंचायत समिती गणांमध्ये शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट सामना रंगला होता. काही ठिकाणी अटीतटीची लढत पाहायला मिळाली; मात्र अंतिम फेऱ्यांमध्ये शिवसेना उमेदवारांनी आघाडी टिकवून ठेवत बाजी मारल्याची माहिती समोर आली आहे. मतमोजणीदरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत होती.
खानापूर तालुक्यातील या निकालाची चर्चा चौका-चौकात रंगू लागली आहे. अधिकृत निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांकडून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
हेही वाचा: सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 : आज मतमोजणी; 551 उमेदवारांचे भवितव्य ठरणार.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










