सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 : आज मतमोजणी; 551 उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
सांगली जिल्हा परिषद कार्यालयाची इमारत (संग्रहित छायाचित्र) | स्रोत : अधिकृत संकेतस्थळ

सांगली : जिल्हा परिषद व दहा पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (९ फेब्रुवारी) संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी सुरू होत आहे. दिवसभरात टप्प्याटप्प्याने अधिकृत निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

Contents

या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एकूण 551 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. प्रमुख पक्षांसह विविध आघाड्यांमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत झाल्याने काही मतदारसंघांत निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाले. आजच्या मतमोजणीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

मतमोजणी केंद्रांवर प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी होणार असून अधिकृत आकडेवारीनुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

सांगली | निवडणूक संदर्भ (२०१७)

२०१७ मधील सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपने २५ जागा जिंकत आघाडी घेतली होती.
इतर पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला १७, काँग्रेसला ७, शिवसेनेला ३, स्वाभिमानी विकास आघाडीला २, रयत विकास आघाडीला ३ तर अपक्ष व इतरांना ३ जागा मिळाल्या होत्या.

पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने आघाडी घेत १२० पैकी ४९ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ३६, काँग्रेसला २२, शिवसेनेला ५, रयत विकास आघाडीला ४, स्वाभिमानी विकास आघाडीला २ तर अपक्ष व इतरांना २ जागा मिळाल्या होत्या.

२०१७ मध्ये पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यात, जिल्हा परिषद व पंचायत समिती दोन्ही स्तरांवर भाजप सर्वाधिक जागांसह अव्वल पक्ष ठरला होता.

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 निकाल लाईव्ह अपडेट्स

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 11:06 am

सांगली जिल्हा परिषद जागा आणि पंचायत समिती निवडणूक मतमोजणी : प्राथमिक कलानुसार भाजप 8 जागांवर आघाडीवर

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या कलानुसार भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार भाजप 8 जागांवर आघाडीवर असून शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 2, काँग्रेस 1 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) 1 जागेवर आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल समोर आले आहेत. अधिकृत निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 11:14 am

पलूस पंचायत समितीत काँग्रेसची एका जागेवर आघाडी

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणीदरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पलूस पंचायत समितीच्या एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. अधिकृत आकडेवारी टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 11:16 am

प्राथमिक कल : २२ जागांचे ट्रेंड समोर; भाजप आघाडीवर

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणीतील उपलब्ध प्राथमिक कलानुसार आतापर्यंत २२ जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असून शिवसेना कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार कल पुढीलप्रमाणे आहे — भाजप ८, शिवसेना ५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) २, काँग्रेस २, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १ आणि इतर १ जागेवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 11:49 am

आटपाडी व तासगाव पंचायत समित्यांचे प्राथमिक कल जाहीर

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणीदरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आटपाडी पंचायत समितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार २ जागांवर आघाडीवर आहेत.

तासगाव पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रत्येकी १ जागेवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 11:59 am

नवीन कल : २५ जागांपैकी १२ जागांवर भाजप आघाडीवर

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीतील ताज्या प्राथमिक कलानुसार एकूण २५ जागांपैकी भाजप १२ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार कल पुढीलप्रमाणे आहेत — शिवसेना ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) २, काँग्रेस २, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १ आणि इतर १ जागेवर आघाडीवर आहेत.

अधिकृत निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार असून अंतिम आकडेवारी बदलू शकते.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 12:20 pm

सांगली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक निकाल २०२६ | नवीन कल : ३५ जागांच्या ट्रेंडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुसंडी

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीतील ताज्या प्राथमिक कलानुसार एकूण ३५ जागांचे ट्रेंड समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुन्हा आघाडीच्या स्पर्धेत आल्याचे चित्र दिसत आहे.

उपलब्ध माहितीनुसार सध्या भाजप १२, शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८, काँग्रेस ६ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १ जागेवर आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल दर्शवत आहेत.

अधिकृत निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असून अंतिम आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 12:35 pm

ताजे कल : १६ जागांवर भाजप आघाडीवर; तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) १० जागांवर

सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणीतील ताज्या प्राथमिक कलानुसार भाजप सध्या १६ जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १० जागांवर आघाडीवर असून निकालासाठी चुरशीची लढत सुरू आहे.

उपलब्ध प्राथमिक आकडेवारीनुसार शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५, काँग्रेस ९ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) १ जागेवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 1:07 pm

कडेगाव पंचायत समितीत काँग्रेस–भाजपमध्ये चुरशीची लढत; काँग्रेस ५, भाजप ३ जागांवर आघाडीवर

सांगली : कडेगाव पंचायत समिती मतमोजणीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत सुरू असल्याचे प्राथमिक कल दर्शवत आहेत. उपलब्ध माहितीनुसार काँग्रेस ५ जागांवर, तर भाजप ३ जागांवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

अधिकृत निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असून पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 1:10 pm

मिरज पंचायत समिती अपडेट : राष्ट्रवादी (अजित पवार गट) ५ जागांवर आघाडीवर

सांगली : मिरज पंचायत समिती मतमोजणीतील ताज्या प्राथमिक कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३, काँग्रेस २ आणि शिवसेना १ जागेवर आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल समोर आले आहेत.

अधिकृत निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत असून अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 1:30 pm

सांगली जिल्ह्यात पंचायत समित्यांमध्ये चुरशीची लढत; जत, शिराळा येथे काट्याची टक्कर

सांगली : जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या मतमोजणीत अनेक ठिकाणी चुरशीची लढत सुरू असल्याचे प्राथमिक कल दर्शवत आहेत. जत तालुक्यातील 16 जागांपैकी काँग्रेस सुमारे 7 जागांवर, तर भाजप 6 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

वाळवा–इस्लामपूर आणि पलूस भागात महाविकास आघाडीतील पक्षांची आघाडी असल्याचे संकेत मिळत आहेत. शिराळा पंचायत समितीत 8 जागांपैकी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रत्येकी 3 जागांवर आघाडीवर असल्याने येथेही काट्याची टक्कर सुरू आहे.

दरम्यान, आटपाडी पंचायत समितीत 8 पैकी 6 जागांवर महायुतीतील उमेदवार आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल समोर आले आहेत. अधिकृत निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत असून अंतिम आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 3:22 pm

Sangli Zp Election Result 2026 : सांगली जिल्हा परिषद 61 पैकी 54 जागांचे निकाल जाहीर; कुणालाच स्पष्ट बहुमत नाही

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीतील आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार 61 पैकी 54 जागांचे निकाल समोर आले आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार भाजप सर्वाधिक 16 जागांवर विजयी ठरला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, इतर पक्ष आणि आघाड्यांनाही काही जागा मिळाल्याने सध्या कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्याचे चित्र दिसत आहे.

2 months agoफेब्रुवारी 9, 2026 6:43 pm

अंतिम चित्र स्पष्ट : सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी (शरद पवार) सर्वात मोठा पक्ष

उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही..

सविस्तर बातमी वाचा: Sangli ZP Election Result 2026.

डिस्क्लेमर : या पृष्ठावरील निवडणूक संबंधित आकडेवारी व कल उपलब्ध अधिकृत माहिती, सार्वजनिक स्रोत आणि विश्वसनीय माध्यमांवर आधारित आहेत. सर्व निकाल टप्प्याटप्प्याने अद्ययावत केले जात असून अंतिम अधिकृत निकालासाठी संबंधित निवडणूक यंत्रणेच्या घोषणेला प्राधान्य द्यावे.

हेही वाचा: मिरजेत मंगळवार पेठेत घरफोडी; 13 तोळे सोने, चांदी व रोकड असा सुमारे 9.64 लाखांचा ऐवज लंपास.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा