जत : जिल्हा परिषद निवडणुकीत जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रभावी कामगिरी करत 9 पैकी 8 गटांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे जत तालुक्यात भाजपचे राजकीय वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन भाजप विरोधी लढत देत असतानाही भाजपने बहुतेक गटांमध्ये आघाडी राखत विजय संपादन केला. उर्वरित एका गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवाराला यश मिळाले.
पंचायत समितीच्या निकालातही भाजप पक्ष आघाडीवर राहिला असून 18 जागांपैकी 12 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसला चार जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला दोन जागा मिळाल्या आहेत.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. विविध ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा: सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 : आज मतमोजणी; 551 उमेदवारांचे भवितव्य ठरणार.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










