मिरज : शहरातील मंगळवार पेठ परिसरात मध्यरात्री उघड्या दरवाजातून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 9 लाख 64 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रदीपसिंह बाबूसिंग रजपूत यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
माहितीनुसार, प्रदीपसिंह रजपूत कुटुंबीयांसह नव्याने बांधलेल्या घरात झोपण्यासाठी गेले असताना जुन्या घरातील काही मौल्यवान वस्तू तिथेच होत्या. दरम्यान, टेरेसकडील दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून सोन्याची माळ, गंठण, मंगळसूत्र, चेन, अंगठ्या आदी सुमारे 13 तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे विविध साहित्य आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास करण्यात आला.
सकाळी घरमालक रजपूत घरी परतल्यानंतर कपाट फोडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
प्राथमिक तपासात घराची माहिती असलेल्या व्यक्तीकडून चोरी झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
हेही वाचा: सांगलीतील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर उपाय; डॉग शेल्टर व पशू शवदाहिनी प्रकल्पांसाठी 5.88 कोटींचा निधी मंजूर.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










