SMKC Election : ईव्हीएम सुरक्षिततेपासून मतदान केंद्रांपर्यंत; सांगलीत मुख्य निवडणूक निरीक्षकांची प्रत्यक्ष पाहणी

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : SMKC Sangli / Official

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काटेकोर नियोजन राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकेयन एस. यांनी आज सांगलीत दाखल होऊन निवडणूक यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी व सखोल आढावा घेतला.

या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी, निवडणूक निरीक्षक संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त (निवडणूक) अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

ईव्हीएम सुरक्षिततेसह निवडणूक व्यवस्थेची तपासणी

मुख्य निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत विविध बाबींची तपासणी केली. मिरज येथील सेंट्रल वेअरहाऊसमध्ये ईव्हीएम यंत्रांची साठवणूक, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा, सीसीटीव्ही, अग्निशमन व्यवस्था आणि सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची पाहणी करण्यात आली. यासोबतच सर्व सहा निवडणूक निर्णय अधिकारी (RO) कार्यालयांमध्ये नामनिर्देशन छाननी प्रक्रिया, मनुष्यबळ नियोजन आणि तांत्रिक सज्जतेचा आढावा घेण्यात आला.

आचारसंहिता अंमलबजावणीवर भर

आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कक्षात प्राप्त तक्रारी, त्यावरील कार्यवाही तसेच FST आणि SST पथकांच्या कामकाजाची माहिती मुख्य निरीक्षकांनी घेतली.

पारदर्शक निवडणुकीसाठी स्पष्ट निर्देश

आढावा बैठकीदरम्यान मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकेयन एस. यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर भर देत महत्त्वाचे निर्देश दिले. सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना नियमांनुसार समान संधी (Level Playing Field) मिळेल याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच ‘शॅडो रजिस्टर’द्वारे निवडणूक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आर्थिक गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, रॅम्प, वीज आणि स्वच्छतागृह यांसारख्या किमान सुविधा ३ जानेवारीपूर्वी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: मालमत्ता कर भरला नाही? १ जानेवारीपासून सुरु होतेय महापालिकेची जप्ती मोहीम.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा