विश्रामबाग मंगळवार बाजार चौकात नाला तुंबण्याची भीती; नाल्यात झाडी वाढल्याने सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
विश्रामबाग मंगळवार बाजार चौकातील नाल्यात वाढलेली झाडी आणि साचलेले सांडपाणी. (छायाचित्र : Sangli Today)

सांगली : विश्रामबाग परिसरातील मंगळवार बाजार चौक येथे रघुवीर अपार्टमेंटसमोरील नाल्यात वाढलेल्या झाडीमुळे सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून नाला तुंबण्याची भीती व्यक्त होत आहे.

या नाल्यातून दिवसभर शहरातील सांडपाणी वाहते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आधीच घाण वास आणि डासांच्या प्रादुर्भावाचा त्रास सहन करावा लागतो. आता नाल्याच्या मधोमध झाड वाढल्याने पाण्याचा वेग कमी होत असून कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळच्या वेळी पाण्याचा प्रवाह वेगात असला तरी वाढलेल्या झाडीमुळे भविष्यात नाला तुंबण्याची शक्यता आहे. वाढलेली झाडी काढून नाला स्वच्छ न केल्यास नाल्यात दूषित पाणी तुंबून रोगराई पसरू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

Mangalwar Bazar Raghuvir apartment Drain Blockage Sangli
विश्रामबाग मंगळवार बाजार चौकातील नाल्यात वाढलेली झाडी; सांडपाण्याचा प्रवाह मंदावल्याचे चित्र. (छायाचित्र : Sangli Today)

वाढलेल्या झाडीसोबतच नाल्यात प्लास्टिक व इतर कचराही साठला आहे. महानगरपालिकेने तातडीने झाडी काढून नाल्याची साफसफाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा: जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा