विट्यात 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा; 40 स्टॉल, नागरिकांना थेट लाभ व मोफत मार्गदर्शन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
विट्यात होणाऱ्या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या नियोजन बैठकीस उपस्थित प्रमुख मान्यवर. | छायाचित्र सौजन्य : जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली

सांगली : विटा येथे शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येत असलेल्या विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष व्ही. डी. निंबाळकर यांनी केले.

जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली येथे झालेल्या नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव गि. ग. कांबळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे व न्यायमूर्ती सोमसेखर सुंदरेसन यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जय मातादी मंगल कार्यालय, विटा येथे हा महामेळावा होणार आहे. यामध्ये विविध शासकीय विभागांचे एकूण 40 स्टॉल उभारण्यात येणार असून संबंधित विभागांचे अधिकारी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. काही लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते योजनांचा प्रत्यक्ष लाभही देण्यात येणार आहे.

या महामेळाव्यात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असून अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व पात्रता निकष याबाबत थेट अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोफत कायदेशीर सल्लाही मिळणार आहे. त्यामुळे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत फेरफटका मारण्याऐवजी सांगली जिल्ह्यातील तसेच विटा परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 751 कोटींची तरतूद; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोठा निर्णय.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा