विटा : विविध शासकीय योजना आणि मोफत कायदेशीर मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा विटा येथे उत्साहात पार पडला. महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, उद्योग, परिवहन, महावितरण, सैनिक कल्याण आदी विभागांचे एकूण 40 स्टॉल नागरिकांसाठी उभारण्यात आले होते.
या स्टॉलवर नागरिकांना सरकारी योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. काही लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचा लाभही देण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी यावेळी विधी सेवा प्राधिकरणामार्फत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सल्ला व वकील सुविधा उपलब्ध करून दिली जाते, याची माहिती दिली. न्यायालयीन प्रक्रियेत अडचण येणाऱ्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महामेळाव्यात महिलांवरील अत्याचार, पोक्सो कायदा, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क यांसंदर्भातही जनजागृती करण्यात आली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमास न्यायालयीन अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा: जिल्हा परिषद अध्यक्षपदावर सांगलीत राजकीय संग्राम; अजित पवार गटाच्या अटीने महायुतीसमोर नवे आव्हान.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










