राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने मतदार यादी प्रसिद्धीस मुदत वाढ

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
फोटो : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी कार्यक्रमात बदल

सांगली : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, प्रभागनिहाय तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या आता 3 जानेवारी 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

यापूर्वी ही प्रक्रिया 27 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीविरहित ठेवण्यासाठी आयोगाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुबार मतदार तपासणी पूर्ण करून संबंधित कंट्रोल चार्ट वेळेत अपलोड करण्यात आले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांनी दिले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव, मतदान केंद्र आणि इतर तपशील तपासावेत, तसेच त्रुटी आढळल्यास वेळेत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: सांगली महापालिका निवडणूक : महायुतीत संभ्रम; शिंदे गट स्वबळाच्या तयारीत.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा