Sangli Politics News | सांगली : महानगरपालिका निवडणुकीसाठीचा अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल नगरविकास विभागाने पूर्ण केला असून आज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे. या अहवालावर अंतिम निर्णय घेऊन आयोगाकडून 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान अधिसूचनेद्वारे अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुसूचित जातीचे आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित केले जाईल, तर मागास प्रवर्गाचे आरक्षण चिठ्ठीद्वारे ठरणार आहे. महिला आरक्षण रोटेशन पद्धतीने लागू करण्यात येणार असल्याची चर्चा असून त्यावर अद्याप संभ्रम कायम आहे.
अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग येणार असून, विविध पक्षांतर्गत उमेदवारीचे समीकरण आणि तिकीट वाटपाची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे.
सांगली मनपा निवडणुका नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतात. यंदा आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या निर्णयानंतर शहराच्या राजकारणात नव्या घडामोडी पाहायला मिळतील.
हेही वाचा: कौटुंबिक वादातून पत्नीचा खून; पतीस दोन दिवसांची पोलिस कोठडी