सांगली : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ (International Human Rights Association – IHRA) च्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी दीपक सुभाष रूपनुर यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या अधिकृत निर्णयानुसार पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतचे नियुक्तीपत्र संघाकडून देण्यात आले आहे.
संघाच्या झालेल्या बैठकीत दीपक रूपनुर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. नियुक्तीप्रसंगी पुणे जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विकास कोळेकर उपस्थित होते. त्यांनी नियुक्तीपत्र देऊन रूपनुर यांचा सन्मान केला.
दीपक रूपनुर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, मानवाधिकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. स्थानिक पातळीवर जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे, अन्यायग्रस्तांना मार्गदर्शन करणे तसेच सामाजिक जनजागृतीचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ (IHRA) ही मानवाधिकार संरक्षण, जनजागृती आणि सामाजिक न्यायासाठी कार्य करणारी संस्था आहे. मानवाधिकारांबाबत तक्रारींची दखल घेणे, पीडितांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच कायदेशीर व सामाजिक पातळीवर मदत पोहोचवणे हे संघाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
संघाच्या सांगली जिल्ह्यातील कामकाजाला दीपक रूपनुर यांच्या नियुक्तीमुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा: संजयनगर झोपडपट्टी नियमितीकरणाला गती; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना पट्टे वाटप.
- Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची दिवाळी गोड! ३०४ तालुक्यांतील दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये थेट खात्यात; राज्य सरकारचा ७,५०० कोटींचा निर्णय, GR जारी
- Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात ‘अर्णब’ चक्रीवादळाचे थैमान; गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार का?
- ST Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! शासनाकडून ₹३९१ कोटींचा निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार पगार?
- Gold Price Prediction 2036: येत्या दशकात सोन्याचा भाव कुठे पोहोचेल? जुन्या आकडेवारीवर आधारित गणित काय सांगतय, वाचा सविस्तर
- Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदीपूर्वी पाहा सांगली, पुण्यासह PNG चे आजचे दर (२७ ऑक्टोबर २०२६)
- Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढला, पारा ३६ पार; ‘या’ ३ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा, पाहा आजचा हवामान अंदाज









