Sangli News | सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील अकलूड (एम) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवण्यात येणाऱ्या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सविता तेजराव नरवाडे (IAS) आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे (IPS) यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान शाळेतील शिक्षक, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. ग्रामीण भागात असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा प्रभावीपणे उभारण्यात आल्याबद्दल अधिकाऱ्यांनी शाळेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

अकलूड (एम) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण बाग, सूक्ष्म सिंचन व्यवस्था, बायोमेट्रिक आधारित उपस्थिती प्रणाली, तसेच शाळेची संपूर्ण डिजिटल नोंदणी व्यवस्था यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जात आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण एकत्र मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे जिल्हा परिषद शाळा या केवळ शिक्षण केंद्र न राहता ग्रामीण विकासाची दिशा ठरवणाऱ्या संस्था ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










