Sangli News | सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत दाखल्यासाठी (NOC) इच्छुक उमेदवारांची महापालिकेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ५५० पेक्षा अधिक इच्छुकांनी NOC साठी अर्ज केल्याची माहिती समोर आली असून, या प्रक्रियेमुळे अवघ्या चार दिवसांत महापालिकेची सुमारे एक कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार महापालिका निवडणूक लढविणारा उमेदवार तसेच त्याचा सूचक व अनुमोदक हे कोणत्याही प्रकारचे थकबाकीदार नसणे बंधनकारक आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कर आणि इतर महापालिकेचे कर पूर्णपणे भरल्याशिवाय NOC दिली जात नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांनी स्वतःचीच नव्हे, तर सूचक-अनुमोदकांचीही थकबाकी भरली आहे.
गेल्या चार दिवसांत घरपट्टी विभागाची जवळपास १ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली असून, पाणीपट्टी विभागाचे ३ ते ४ लाख रुपये वसूल झाले आहेत. येत्या काही दिवसात ही वसूली आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली असून, २७ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. या कालावधीत एकूण दोन कोटी रुपयांपर्यंत थकबाकी वसूल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: प्राथमिक शिक्षकांना आठवड्यातून एक दिवस अंगणवाडीत शिकवावे लागणार; शिक्षण विभागाचा नवा आदेश.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










