Sangli News: निवडणूक आली की विकासाच्या घोषणा; निवडणुकीनंतर प्रश्न जैसे थे

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
Sangli Election Development | विकासाच्या घोषणांवर नागरिकांचा रोष (फोटो : सांगली टुडे)

Sangli News | सांगली : महापालिका, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जवळ आली की सांगलीच्या विकासाबाबत मोठमोठी आश्वासने दिली जातात. विमानतळ, औद्योगिक विकास, रोजगार, रस्ते, पायाभूत सुविधा यांसारखे मुद्दे पुन्हा चर्चेत येतात. मात्र निवडणूक पार पडताच हे विषय हळूहळू मागे पडतात, असा अनुभव अनेक सांगलीकर व्यक्त करत आहेत.

अलीकडेच सोशल मीडियावर नागरिकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली असून, “निवडणूक झाली की पुन्हा सांगली वाऱ्यावर” अशी प्रतिक्रिया उमटत आहे. कोणताही राजकीय पक्ष असो किंवा कोणताही नेता — निवडणुकीच्या काळात विकासाची भाषा आणि निवडणुकीनंतरची शांतता, हे चित्र अनेक वर्षांपासून कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेषतः सांगली–मिरज–कुपवाड परिसराच्या विकासाबाबत विमानतळ, औद्योगिकीकरण आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर वारंवार आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात या बाबतीत ठोस प्रगती होताना दिसत नसल्याने तरुण वर्गात नाराजी वाढताना दिसते.

“पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकसारख्या शहरांचा वेगाने विकास झाला; मात्र सांगलीकडे कायम दुर्लक्ष झाले,” अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. रस्ते, ड्रेनेज, पार्किंग, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरही निवडणुकीनंतर अपेक्षित गती दिसून येत नसल्याचा आरोप आहे.

नागरिकांच्या मते, विकास म्हणजे फक्त भाषण किंवा घोषणा नाही, तर सातत्याने होणारी कामे आणि परिणाम दिसणे आवश्यक आहे.

दरम्यान, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विकासाचे मुद्दे चर्चेत येत असताना, यावेळी तरी केवळ आश्वासने न राहता प्रत्यक्ष कामे होतील का, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: सांगलीत आज सोन्याचा दर किती? 2026 मध्ये दर कुठपर्यंत जाऊ शकतो – तज्ञांच मत काय.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा