आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यू. टी. जाधव तसेच प्रभाग क्रमांक ७ मधून नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. जयंत पाटील यांचा सत्कार सोहळा अनुसे मळा, ता. आटपाडी येथे पार पडला. या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख उपस्थित होते.
या वेळी आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या अनुसे मळा आणि कोळेकर मळा येथील ग्रामस्थांचे कौतुक केले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, “आटपाडीच्या विकासासाठी ही विजयाची सुरुवात असून, जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”
या सत्कार सोहळ्यास नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश देशमुख, आबासाहेब पाटील, अजित जाधव, राधिकाताई दौंडे यांच्यासह शंकर काळेबाग, रोहित जगताप, विनायक पाटील, मच्छिंद्र कोळेकर, तुकाराम कोळेकर, भारत अनुसे, पोपट कोळेकर, दत्तात्रय कोळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास अनुसे मळा व कोळेकर मळा परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, नगरपंचायतीच्या आगामी कार्यकाळाबाबत उपस्थितांमध्ये चर्चा झाली.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










