सांगली : सांगली जिल्ह्यात एकीकडे अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्यावर सातत्याने कारवाई सुरू असताना, दुसरीकडे सिगारेट विक्रीदरांबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सिगारेट पॅकवर छापलेल्या MRP पेक्षा जास्त दराने विक्री होत आहे.
सध्या सांगली शहरातील विविध भागांत सिगारेटच्या किमती वाढल्याचे सांगत दुकानदार प्रत्येक सिगारेटमागे ३ ते ४ रुपये अधिक आकारत आहेत. मात्र, उपलब्ध सिगारेट पॅकवर अजूनही जुनीच MRP छापलेली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अधिकृत दरवाढ झाली आहे की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
नुकतीच FDA ने सांगलीवाडी परिसरात मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख रुपयांची प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला होता. अशा पार्श्वभूमीवर सिगारेटसारख्या कायदेशीर विक्री असलेल्या उत्पादनांच्या दरांबाबत स्पष्ट नियम आणि अंमलबजावणी अपेक्षित आहे.
सिगारेट विक्रीदर, MRP आणि प्रत्यक्ष आकारला जाणारा दर यामध्ये फरक दिसून येत असल्याने, अधिकृत दरवाढ असल्यास त्याबाबत स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा MRP पेक्षा जास्त दर आकारले जात असतील, तर त्याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा: जिल्ह्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित छळप्रकरणाची उच्चस्तरीय महिला समितीमार्फत चौकशीची मागणी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










