सांगली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बारावीचे हॉल तिकीट मंगळवार (ता. १२) पासून उपलब्ध होणार आहे. कोल्हापूर विभागाअंतर्गत सांगली जिल्ह्यासह सर्व परीक्षा केंद्रांवर यंदा गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गखोलीत CCTV कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. कोल्हापूर विभागात एकूण ५३९ परीक्षा केंद्रे असून, त्यापैकी अनेक केंद्रांवर CCTV बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मंडळाच्या माहितीनुसार, ज्या परीक्षा केंद्रांवर अद्याप CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत, त्या संस्थांना पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त लक्ष ठेवण्यात येणार असून, काही केंद्रांवरील CCTV चित्रण थेट प्रशासनाकडे उपलब्ध करून दिले जाणार आहे.
परीक्षा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य मंडळ व विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. यामधून परीक्षेदरम्यान होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असून, कोणताही गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी हॉल तिकीट वेळेत डाऊनलोड करून त्यावरील माहिती काळजीपूर्वक तपासावी, तसेच परीक्षा केंद्र, वेळापत्रक व नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: बंडखोरीचा फटका; भाजपकडून माजी नगरसेवकांसह ९ जणांचे सहा वर्षांसाठी निलंबन.
- शिराळ्यातील बेलदारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी










