सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे वाहन अपघातात गंभीर जखमी झालेल्या मादी रानगव्याचे प्राण सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत उपचार करून वाचवले. अपघातानंतर गव्याची प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने सिझेरियन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वनखाते कोल्हापूरकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि डॉ. संतोष वाळवेकर यांच्या कॉलनंतर सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाची तज्ज्ञ टीम तात्काळ कडगाव येथे दाखल झाली. तपासणीदरम्यान मादी गव्याची अवस्था गंभीर असल्याचे आणि ती गाभण असल्याचे निदर्शनास आले. अंतर्गत जखमांमुळे व रक्तस्रावामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
गव्याचा जीव वाचवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग वाळवा आणि वनविभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त टीमने सिझेरियन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले. या उपचार प्रक्रियेत डॉ. सचिन वंजारी, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. अंबादास माडकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रविण निमसे आणि मुकुंद वाटेगावकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सिझेरियननंतर मादी रानगव्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, तिच्यावर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. तातडीचा निर्णय, समन्वय आणि वैद्यकीय कौशल्यामुळे एका दुर्मीळ वन्यजीवाचे प्राण वाचल्याने सर्व स्तरांतून या कार्याचे कौतुक होत आहे.
हेही वाचा: रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 21 जानेवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










