सांगली : माधवनगर जकात नाक्याजवळील शिवोदयनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा गुरुवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद संजयनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सुलभा बाळासाहेब सपकाळ (वय 45) असे मृत महिलेचे नाव असून त्या कुटुंबासह म्हाडा वसाहतीतील एका इमारतीत वास्तव्यास होत्या. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल व तपासानंतर पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: मिरजेत निवडणूक काळात बेकायदा जमाव व मारहाणीचा प्रकार; 7 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










