मिरज : मिरज शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या काळात बेकायदा जमाव जमवून एका उमेदवाराच्या घरात प्रवेश करून मारहाण केल्याचा प्रकार घडल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, प्रभाग क्रमांक तीनमधील राखीव गटातील शिंदे सेनेचे उमेदवार सागर मोहन वनखंडे (वय 28) हे 14 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या मिरज येथील निवासस्थानी निवडणुकीच्या अनुषंगाने बुथ कमिटीची बैठक घेत होते. यावेळी संदीप व्हनमाने व त्यांच्या काही साथीदारांनी बेकायदा जमाव जमवून घराच्या आवारात प्रवेश केल्याचा आरोप आहे.
या प्रसंगी सागर वनखंडे यांचा मित्र सौरभ चंद याच्याशी धक्काबुक्की करत त्याला मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, सागर वनखंडे यांनी याबाबत जाब विचारला असता त्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या काही नागरिकांनाही धक्काबुक्की व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संदीप सोपान व्हनमाने (रा. इस्रायल नगर, मिरज), ओंकार संजय कांबळे, विशाल साळुंके, स्टीवन देवकुळे, समित खानविलकर, विशाल सौंदडे आणि अभी होळकर (सर्व रा. मिरज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेबाबतची अधिक माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी संबंधित संशयितांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- कर्नाटकला कत्तलीसाठी नेत असताना 5 खिल्लार बैलांची सुटका; बोलेरो पिकअपसह कारवाई
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli News: सांगलीतील कॅफे संस्कृती पुन्हा चर्चेत; अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर सामाजिक संघटना आक्रमक










