सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत १३ ते १६ जानेवारीदरम्यान ‘ड्राय डे’ लागू करण्यात आला असला, तरी शहरालगतच्या काही भागांत दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सांगली शहरापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असलेला माधवनगर रोड परिसर महानगरपालिका हद्दीत येत नसल्याने, त्या भागातील हॉटेल्स, बार आणि दारूची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक ड्राय डेच्या कालावधीत त्या भागात जाऊन मद्यपान करत असल्याचे तसेच दारूची खरेदी करत असल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे.
विशेषतः संध्याकाळच्या वेळेत माधवनगर रोड परिसरातील दारू दुकाने आणि बार परिसरात मोठी गर्दी होत असल्याचेही आढळून येत आहे. सांगली शहरात मद्यविक्रीवर पूर्ण बंदी असताना, शहरालगतच्या हद्दीबाहेरील भागात विक्री सुरू असल्याने ड्राय डेचा प्रत्यक्ष परिणाम मर्यादित राहतोय, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ड्राय डे आदेश महानगरपालिका हद्दीपुरताच लागू असल्याने, प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने लागू केलेल्या ड्राय डेचा अपेक्षित परिणाम कितपत साध्य होतोय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा वाजेगाव घरफोडी प्रकरणी सराईत आरोपी अटकेत; २.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Gold Rate Today: दिवाळी खरेदीत सोन धडाम; २२K आणि २४K चे भाव किती उतरले? पाहा पीएनजीचे आजचे ताजे दर
- FASTag Local Pass: टोल नाक्यावर रांगेत थांबण्याचा मनस्ताप संपला! ‘राजमार्गयात्रा’ ॲपवरून घरबसल्या कसा काढायचा लोकल पास? जाणून घ्या नियम
- Nagpur Goa Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला सांगली, कोल्हापुरात पुन्हा वेग; कोणत्या जिल्ह्यातून किती किमी जाणार? पाहा सविस्तर आकडेवारी
- Ladki Bahin Yojana: दिवाळी सणासाठी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा? खात्यात १५०० जमा होणार की ३०००? पाहा नेमकी स्थिती
- Ladki Bahin Yojana: एकाच जिल्ह्यात १९०० तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार?
- सांगलीत इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर घेताय? खरेदीपूर्वी तपासा या 7 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी









