Sangli Public Issue : ‘टाइमपास गेम’च्या नावाखाली पैसे लावून जुगार; शहरात बंद, पण हद्दीबाहेर खुलेआम सुरू, तरुण पिढी धोक्यात, जवाबदारी कुणाची?

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
प्रातिनिधिक छायाचित्र : Sangli Today

सांगली : सांगली शहरात काही महिन्यांपूर्वी ‘टाइमपास’ आणि व्हिडिओ गेमच्या नावाखाली पैसे लावून जुगाराचा खेळ सुरु असणाऱ्या दुकानांवर कारवाई झाल्यानंतर शहरातील बहुतांश दुकाने बंद झाली. मात्र, आता सांगली महानगरपालिका हद्दीबाहेरील परिसरात, विशेषतः माधवनगर ते बुधगाव रोड दरम्यान अशाच प्रकारची दुकाने पुन्हा जोमात सुरू आहेत.

या दुकानांमध्ये ‘टाइमपास’ किंवा गेमिंगच्या नावाखाली थेट पैशांवर खेळ खेळवले जात आहेत. चक्र फिरवणाऱ्या मशीन, पिनॅकल व्हीलसारखे खेळ आणि विविध मशीनद्वारे १००, ५००, १०००, १०००० रुपयांपर्यंत रक्कम लावून गेम खेळण्याची मुभा दिली जात आहे. एखाद्या वेळेस खेळणाऱ्यास जादा रक्कम मिळते, मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये रोजच्या रोज पैसे गमावले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

या प्रकारामुळे सांगली जिल्ह्यातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे. शिक्षण, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून अनेक तरुण या खेळांच्या आहारी गेले असून, काही ठिकाणी कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणावाची परिस्थितीही निर्माण होत आहे.

शहरात कारवाई झाल्यानंतर ही दुकाने मुद्दाम महानगरपालिका हद्दीबाहेर स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट आहे. महानगरपालिका हद्दीबाहेर असल्याने नियंत्रण सैल होते आणि त्याचाच गैरफायदा घेऊन हे प्रकार खुलेआम सुरू आहेत. शहरात बंदी, पण अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर पूर्ण मोकळीक अशी विसंगत स्थिती सध्या सांगली परिसरात निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, केवळ महापालिका हद्दीपुरती मर्यादित कारवाई न करता संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकसमान, कठोर आणि सातत्यपूर्ण उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ‘टाइमपास’च्या नावाखाली चालणारे हे पैसे लावून खेळले जाणारे खेळ तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करत राहतील, हे वास्तव नाकारता येणार नाही.

हेही वाचा: सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेचा निकाल जाहीर; भाजपचा दणदणीत विजय.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा