सांगली : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या भरारी पथकाने कुपवाड परिसरात कडक कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्याचे आढळून आलेल्या दोन व्यावसायिकांवर महापालिकेच्या भरारी पथकाने थेट कारवाई करत एकूण 30 हजार रुपयांचा दंड ऑन-द-स्पॉट वसूल केला.
महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त (आरोग्य) स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कुपवाड भागात पथकाची नियमित गस्त सुरू असताना संबंधित व्यावसायिक सार्वजनिक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने कचरा टाकत असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना रंगेहात पकडून त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने “झिरो टॉलरन्स” धोरण राबवण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले जातील असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महानगरपालिकेकडून नागरिकांना आणि व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करून तो केवळ घंटागाडीतच टाकावा इतरत्र टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे. रस्ते, मोकळ्या जागा, नाले किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास भरारी पथकाकडून थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा: शहर स्वच्छतेसाठी ‘सांगलीच्या भिंती बोलू लागल्यात’ उपक्रमातून जनजागृती.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










