सांगली : २५ जानेवारी रोजी साजऱ्या झालेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त, २०२४ साली मतदार नोंदणी प्रक्रियेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांना ‘सर्वोत्तम निवडणूक नोंदणी अधिकारी (Best Electoral Registration Officer – ERO)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कळवण (जि. नाशिक) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना राबवलेल्या विविध मतदार नोंदणी मोहिमांची दखल घेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
२०२४ साली त्यांच्या कार्यकाळात मतदार यादी शुद्धीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. तसेच महिला मतदार नोंदणीवर विशेष भर देत लैंगिक समावेशकता वाढवण्यात आली. याशिवाय आदिवासी भागांमध्ये, विशेषतः PVTG कातकरी समाजातील मतदारांच्या नोंदणीसाठी राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली होती.
लोकशाहीच्या मुळाशी पोहोचणाऱ्या या कामगिरीची दखल घेत निवडणूक आयोगाने नरवाडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “एक मतदार म्हणजे लोकशाहीचा एक मजबूत पाया” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवणाऱ्या उपक्रमांमुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा पुरस्कार प्रशासकीय सेवेमधील उत्कृष्टतेचे उदाहरण असून, आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे.
हेही वाचा: धामणी रोडवरिओ मयूर नर्सरी आगीतील मृत्यू प्रकरणात संशय वाढला; पाच पथकांकडून शोधमोहीम सुरु.
- वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे डंपर पलटी; उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू
- सांगलीच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; प्रसूतीनंतर नवजात बाळाला सोडून आई गायब
- माधवनगरमध्ये घरासमोरून दुचाकी चोरी; संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल
- वाळवा तालुक्यात भीषण अपघात; पुलावर दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू, मित्र गंभीर जखमी
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू









