सांगली : सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस नागरिकांनी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. देशरक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या तसेच युद्धजन्य परिस्थितीत जखमी किंवा अपंगत्व आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो.
जिल्हाधिकारी काकडे म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी अनेक जवानांना बलिदान द्यावे लागते. त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी कमी करण्यासाठी आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांना आर्थिक बळ देण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी महत्त्वाची भूमिका बजावतो. ७ डिसेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत निधी संकलन मोहीम सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील १६० शूर सैनिकांनी देशरक्षणार्थ बलिदान दिले आहे. तसेच हजारो माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा जिल्ह्यात वास्तव आहे. जिल्ह्यातील वीर सैनिकांना १ महावीर चक्र, ९ वीर चक्र, १ शौर्य चक्र तसेच ३१ सेना, नौसेना व वायुसेना पदके प्राप्त झाली आहेत. सध्या जिल्ह्यातील ३० हजारांहून अधिक सैनिक देशसेवेत कार्यरत आहेत.
या निधीस दिलेली देणगी आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० जी (५) (VI) अंतर्गत करमुक्त आहे. नागरिकांनी UPI, NEFT, RTGS किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने देणगी जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
ध्वजदिन निधी खालील खात्यावर जमा करावा :
नाव : Collector and President Armed Forces Flag Day Fund, Zilla Sainik Welfare Office, Sangli
बँक : Bank of Maharashtra, City Post Office Branch, Sangli
Account No. : 20050003864
IFSC Code : MAHB0000020
MICR Code : 0416014151
हेही वाचा: विट्यात 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा; 40 स्टॉल, नागरिकांना थेट लाभ व मोफत मार्गदर्शन.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










