सांगलीसाठी 206 कोटींच्या वाढीव निधीची मागणी; 751 कोटींच्या आराखड्यावर राज्यस्तरीय चर्चा

Sangli Today Desk
By
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक...
- News Desk
छायाचित्र सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

सांगली : जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी प्रस्तावित 751 कोटी 8 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यावर मुंबईत राज्यस्तरीय बैठक पार पडली. राज्याच्या नियोजन विभागाने सुरुवातीला 545 कोटी 8 लाख रुपयांचा कमाल नियतव्यय कळवला होता; मात्र जिल्ह्याच्या स्थानिक गरजांचा विचार करून 206 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाढीव मागणीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य तितका अतिरिक्त निधी देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही बैठकीत दिली.

बैठकीत जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा, सिंचन, पर्यटन, औद्योगिक विकास आणि उत्पन्नवाढीशी संबंधित प्रकल्पांवर चर्चा झाली. कवलापूर विमानतळ, मल्टीलॉजिस्टिक्स पार्क, तसेच पर्यटनवाढीच्या संधींबाबत मुद्दे मांडण्यात आले.

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याने पुढील टप्प्यात सौरऊर्जेचा वापर वाढवण्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. चांदोली अभयारण्य व कृषी पर्यटनाला चालना देण्याबाबतही संकल्प मांडण्यात आल्या.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मागील पाच वर्षांतील पूर्ण झालेल्या कामांचे सादरीकरण करत नवीन आराखड्यातील प्रस्तावांची माहिती दिली. वाढीव निधीबाबतचा अंतिम निर्णय राज्यस्तरावर घेतला जाणार आहे.

हेही वाचा: महिलांना थेट प्रशासनासमोर तक्रारी मांडण्याची संधी; 16 फेब्रुवारीला सांगलीत महिला लोकशाही दिन.

Share This Article
Follow:
सांगली टुडे डेस्क ही SangliToday.com या डिजिटल न्यूज पोर्टलची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संपादक आणि वार्ताहर कार्यरत आहेत. आम्ही सांगली जिल्ह्यातील ताज्या मराठी बातम्या अचूक, पडताळलेल्या आणि जबाबदार पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास कटिबद्ध आहोत.Sangli Today वर सांगली, मिरज, तासगाव, वाळवा, जत, खानापूर (विटा), पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि आटपाडी या तालुक्यांमधील राजकारण, प्रशासन, गुन्हे, शेती, हवामान, शिक्षण, आरोग्य आणि नागरिक प्रश्नांवरील स्थानिक बातम्या प्रकाशित केल्या जातात.प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्यावर केंद्रित Hyper-local reporting करून नागरिकांसाठी महत्त्वाच्या घटनांचे विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.Published by Sangli Today Desk – Local News Coverage from Sangli Districtसंपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, MIDC Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416 ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा