मिरज : प्रेमविवाह केल्याच्या रागातून मिरज शहरातील सुभाषनगर परिसरात दाम्पत्यास घरात घुसून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश नवनाथ लोंढे (वय 36, रा. सुभाषनगर, मिरज) व आश्विनी सदामस्त यांनी प्रेमविवाह केला होता. या विवाहावरून नाराज असलेल्या नातेवाईकांनी संदेश यास घरात घुसून मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारीनुसार, आश्विनीचा भाऊ आकाश बाळू सदामस्त याने मोबाईलवरून संदेश यास शिवीगाळ व धमकी दिली होती. त्यानंतर काही जणांनी त्यांच्या घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संदेश लोंढे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तक्रारीनुसार, आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच घरातील वस्तूंचा वापर करून हल्ला केल्याचा आरोप आहे. पत्नी आश्विनी हिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण झाल्याची नोंद तक्रारीत आहे.
या घटनेप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा: सांगलीसाठी 206 कोटींच्या वाढीव निधीची मागणी; 751 कोटींच्या आराखड्यावर राज्यस्तरीय चर्चा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










