सांगली : वाढता शेती खर्च आणि अनिश्चित बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी पूरक उत्पन्नाच्या शोधात आहेत. अशा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात 11 मार्च 2026 पर्यंत ‘महारेशीम अभियान’ राबवले जात आहे. या मोहिमेदरम्यान रेशीम शेतीसाठी थेट मार्गदर्शन आणि 2026-27 हंगामासाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील गावोगावी विशेष ‘रेशीम रथ’ फिरणार असून जत, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर, तासगाव, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष माहिती दिली जाणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांना लागवड पद्धती, किड नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया आणि संभाव्य उत्पन्नाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
रेशीम उद्योग कमी क्षेत्रात सुरू करता येतो आणि पारंपरिक पिकांसोबत पूरक व्यवसाय म्हणून करता येतो. त्यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
11 मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी नियोजनबद्ध मार्गदर्शन मिळणार आहे.
हेही वाचा: 20 फेब्रुवारी अंतिम मुदत: सांगली जिल्ह्यातील बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










